टायर फुटल्याने ऊसाचा ट्रक पलटी : कराड शहरात विजय दिवस चाैकातील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरातील मुख्य चाैक असलेल्या विजय दिवस चाैकात आज दि. 28 रोजी 2.15 वाजता ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. या चाैकात सर्वात जास्त वाहतूक असते तसेच लोकांची वर्दळ असते. त्यामुळे ट्रक पलटी होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

मायणी येथून उसाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच – 04-बीजी- 3740) हा कराड शहरातून उंडाळे रस्त्याला असलेल्या एका शुगर मिलकडे निघाला होता. कराड शहरातील विजय दिवस चाैकात सिग्नलजवळ आल्यानंतर ट्रकचा पाठीमागील अॅक्सल तुटल्याने हा अपघात झाला. अॅक्सल तुटल्याने पाठीमागील दोन्ही चाके बाजूला तुटून गेलेली आहेत. अपघात मोठा झाला असला तरी यामध्ये प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ऊसाच्या ट्रकचा टायर फुटून अपघात; शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ट्रक पलटला

विजय दिवस चाैकात कराड- विटा मार्गावर हा अपघात झाला असून येथे विटा- पुसेसावळी, मसूर या भागात जाणारी वडाप वाहने थांबलेली असतात. तसेच शेजारी छ. शिवाजी व विठामाता हायस्कूल असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. या चाैकात पाच रस्ते येतात, त्यामुळे वाहतूकीची वर्दळ मोठी असते. तरीही अपघातात केवळ चालक जखमी झाला आहे. मात्र ट्रक पलटी होताच या मार्गावर पाचही रस्त्यांवर ट्रफिक जाम झालेले होते.

Leave a Comment