नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन वर्गमित्रांकडून अत्याचार

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना शनिवारी उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील नववीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला चाकूचा धाक दाखवून दोन वर्ग मित्रांनी तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्क्कादायक माहिती म्हणजे अत्याचार करण्यात आलेली पीडित मुलगीही सात महिन्याची गर्भवती आहे. मेढा पोलीस ठाण्यात पीडित मुलीने फिर्याद दाखल केली असून दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दोन अल्पवयीन मुलांची सातारा येथील बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १४ वर्षीय नववीत शिक्षण घेत असलेली मुलगी तिच्या शेतात कुटुंबियांसमवेत राहत होती. तिच्याच वर्गात शिकत असलेली दोन वर्गमित्र मुले या अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आले. घरात कोणी नसल्याचे पाहत तिला त्या मुलांनी चाकूचा धाक दाखवला. तसेच दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करतानाचे मोबाईलवर चित्रीकरणही केले. केलेल्या चित्रीकरणाच्या आधारावर तिच्यावर गेल्या एक महिन्यापासून दोघांनी वारंवार अत्याचार केला आहे, अशी माहिती पीडित मुलीने आपल्या फिर्यादीत दिली आहे.

तिच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असल्याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबियांना दिली. धक्क्कादायक माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मेढा पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अत्याचार केलेल्या अल्पवयीन मुलांना तत्काळ ताब्यात घेतले. तसेच सातारा येथील बालसुधारगृहात त्यांची रवानगी केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, इम्रान मेटकरी, पद्मश्री घोरपडे व रफिक शेख करीत आहेत.

You might also like