कराडला सिग्नल तोडणारा चोरटा चोरीच्या दुचाकीसह ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | येथील कर्मवीर चौकात सिग्नल तोडून पळ काढण्याच्या नादात असलेल्या दुचाकी चोरट्यास पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडले. ही घटना रविवारी घडली. जावेद दस्तगिर मदबरी (वय- 27, रा. आटके ता. कराड) असे अटक केलेल्या चोरट्याने नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चोरीची दुचाकी घेऊन जावेद मदबरी हा पळून निघाला होता. ही बाब नागरिकांच्या निदर्शनास येताच बस स्थानक परिसरात नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी आपल्या पाठीमागे नागरिक लागल्याचे त्या चोरट्यास समजताच त्या चोरट्याने गाडी जोराने पळवली. यादरम्यान त्याने कर्मवीर चौकातील सिग्नल तोडला. तेव्हा काही नागरिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत त्या चोरट्याला ताब्यात घेतले.

संशयिताकडे अधिक चौकशी केली असता कृष्णा हॉस्पिटल परिसरातील दोन दुचाकी त्याने चोरल्याचे कबूल केले. त्या दोन्हीही दुचाकी पोलिसांनी जप्त करून जावेद मतबरीला अटक केली. पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले. दोन दुचाकी पैकी एका दुचाकीच्या मालकाचा शोध लागला असून दुसरी दुचाकी कोणाचे आहे याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

Leave a Comment