Tuesday, February 7, 2023

औरंगाबादेत पुन्हा पावसाने दाणादाण ! न्यायालयाच्या आवारात वाहनांवर कोसळले झाड

- Advertisement -

औरंगाबाद – शहरात दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मागील एका महिन्यापासून औरंगाबादकरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आज ही जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले. यावेळी सेशन कोर्टात उभ्या असलेल्या कार वार्‍यामुळे झाड कोसळले, सुदैवाने कार मधील वकील थोडक्यात बचावले आहेत. मात्र, या झाड कोसळल्याने सुमारे दहा ते बारा चारचाकींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शहरात दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून येत अंधार झाला. यानंतर वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह तब्बल एक तास मुसळधार पाऊस पडला. या दरम्यान उच्च न्यायालयाच्या जुन्या इमारती मागे काही वकिलांनी आपली चार चाकी कार पार्क केली होती. या ठिकाणी वार्‍यामुळे अचानक या कारवर झाड कोसळले. यामुळे सुमारे दहा ते बारा चार चाकी चे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

न्यायालयात असा प्रकार होत असेल तर नक्कीच लाजिरवाणी बाब आहे, न्यायालयात तरी नियोजन असणे गरजेचे आहे. ज्या गाड्यांचे नुकसान झाले ते न्यायालयाने जबाबदार विभागाकडून तात्काळ भरपाई करून देण्याचे आदेश द्यावे. – ऍड. भारत फुलारे, कार्याध्यक्ष, डावात मचळा पार्टी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

10, 12 चारचाकी