व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचे वन डे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक, असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टेफान नेरो (Stefan Nero) याने वन डे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. त्याने आपल्या खेळीत 140 चेंडूंत नाबाद 309 धावा करून हा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. वन डेक्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा स्टेफान (Stefan Nero) हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अंध क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध ही विक्रमी कामगिरी केली आहे. या विक्रमासह त्याने पाकिस्तानच्या मसून जानने 1998साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोंदवलेला 262 धावांचा विक्रम मोडला आहे.

स्टेफानने (Stefan Nero) 140 चेंडूंत 49 चौकार व 1 षटकार खेचून ही विक्रमी खेळी केली. 40 षटकांच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 541 धावांचा डोंगर उभा केला. वन डे क्रिकेटमधील कोणत्याही संघाकडून झालेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. स्टेफानशिवाय (Stefan Nero) या सामन्यात मायकल जॅनिसने 58 व ब्रियूर माईगाने 50 धावा केल्या. 542 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला फक्त 272 धावा करता आल्या आणि ऑस्ट्रेलिायने 269 धावांनी हा सामना जिंकला.

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात 8 सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतच्या झालेल्या 6 लढती जिंकल्या आहेत. स्टेफानने (Stefan Nero) या मालिकेत खेळलेल्या तीनही सामन्यांत शतकी खेळी केली आहे. त्याने (Stefan Nero) पहिल्या सामन्यात 146 चेंडूंत 112 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 47 चेंडूंत 101 धावा तर तिसऱ्या सामन्यात 140 चेंडूंत नाबाद 309 धावा केल्या आहेत. अंध क्रिकेट मध्ये 11-11खेळाडू खेळतात, परंतु त्यांची विभागणी तीन गटांत केलेली असते. 4 खेळाडू पूर्णपणे अंध असतात, 3 खेळाडू आंशिक दृष्टीहीन असतात, तर 4 खेळाडूंना आंशिक दिसते.

हे पण वाचा :
BCCI ने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे मोहम्मद कैफ झाला इमोशनल

गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

IPL Media Rights : आयपीएल मीडिया हक्क खरेदी करण्यात ‘या’ कंपनीने मारली बाजी

Trent Boult ने मोडला फलंदाजीतला ‘हा’ विश्वविक्रम !!!

राहुल गांधी, सोनिया गांधीवर ED ने कारवाई केल्यास राज्यभर जेलभरो आंदोलन : पृथ्वीराज चव्हाण