Sunday, March 26, 2023

एक वेंटिलेटरवर चार रुग्णांवर उपचार करणार, DRDO च्या प्रयत्नांना यश

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पुढे आली आहे. डीआरडीओने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे एकाच वेळी चार रुग्णांना व्हेंटिलेटरद्वारे मदत करेल. डीआरडीओचे संचालक सांगतात की आम्ही यासाठी कोणतेही नवीन व्हेंटिलेटर तयार करत नाही आहोत, तर त्या आधीपासूनच असलेल्यांमध्ये काही बदल करत आहोत. अशाप्रकारे, कोरोनामुळे ग्रस्त असलेल्या कोणत्याही पेशंटला व्हेंटिलेटरची कमतरता येऊ शकणार नाही. याशिवाय डीआरडीओ दररोज २० हजार वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) बनवण्याचीही तयारी करत आहे. युद्धपातळीवर एन ९९ मास्कही तयार केले जात आहेत.

डीआरडीओचे संचालक डॉ. जी. सतीश रेड्डी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना माहिती देताना म्हणाले की, आमच्या संस्थेत दिवसरात्र रात्रंदिवस एन ९९ मास्क तयार केले जात आहेत.कोणत्याही टप्प्यावर याची कमी होऊ देणार नाही. आतापर्यंत४० हजार मास्क दिल्ली पोलिसांना पुरविण्यात आले आहेत. त्याचबरोबर डीआरडीओने दिल्ली पोलिसांसह देशभरात एक लाख लिटर सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे.

- Advertisement -

यूपीमध्ये व्हेंटिलेटर आणि मास्क -सेनिटायझर विक्रीवर बंदी आहे.उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ यांच्या वतीने व्हेंटिलेटर आणि मास्क -सेनिटायझर्स उत्पादकांना पुढील आदेश येईपर्यंत तिन्ही वस्तूंची निर्यात करू नये, अशा विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर, देशातील खुल्या बाजारात व्हेंटिलेटर आणि मास्क-सेनिटायझर्सची विक्रीही होणार नाही. यावेळी जेवढा माल कंपनीत ठेवलेला आहे ते सर्व सामान आहे तिथेच राहील. जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा सरकार ते केवळ जनतेसाठी खरेदी करेल. एखाद्या कंपनीने सरकारच्या या सूचनांचे उल्लंघन केल्यास त्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता