कराड | पुणे- बंगलोर महामार्गावर भुयाचीवाडी येथे उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या धडकेत एक महिला जागीच ठार झाली असून अन्य पाचजण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमीमधील दोन लहान मुली व अन्य एका महिला असे तीनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती उंब्रज पोलिस सहाय्यक ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कल्याण- ठाणे येथून कोल्हापूला निघालेली एक इनोव्हा गाडी क्रमांक (MH- 05- EA- 2642) आणि भुयाचीवाडी येथे राजपुरोहित ढाबा येथे उभा असलेला ट्रक क्रमांक (MH- 12- DT- 0779) याचा अपघात झाला. गुरूवारी दि. 11 रोजी सकाळी 7 ते 7.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राजपुरोहित ढाबा येथे ट्रकचालकांने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून बाथरूमला गेला होता. यावेळी साताराकडून कोल्हापूरच्या दिशेला निघालेली इनोव्हा गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली.
या गाडीत सहाजण होते. त्यातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक महिला व दोन मुली 13 व 14 वर्षे वयाच्या या गंभीर जखमी आहेत. उंब्रज पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा केला आहे. जखमींना उपचारासाठी कराड येथील सह्याद्री हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदरील अपघातातील लोक हे कल्याण- ठाणे येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.