व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पाठीवर मुलाला घेऊन रस्ता झाडताना दिसली महिला, व्हिडिओ पाहून तुम्हीसुद्धा कराल सलाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या आईसारखे (Mother) दुसरे दैवत या जगात नाही असे म्हंटले जाते. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका आईची (Mother) अथक धडपड पाहून लोक थक्क झाले आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला रस्ता झाडताना दिसत आहे आणि यादरम्यान तिने तिच्या लहान मुलाला पाठीवर बांधले आहे. लक्ष्मी मुखी असे या महिलेचे नाव आहे. ती मूळची ओडिशाची असून गेली 10 वर्षे बारीपाडा नगरपालिकेत झाडलोटचे काम करते. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

याबद्दल त्या महिलेला विचारले असता, ती (Mother) तिच्या घरात एकटीच असते. त्यामुळे तिला तिच्या मुलाला पाठीवर बांधून काम करावे लागते. ही तिच्यासाठी अडचण नसून हे तिचे कर्तव्य आहे, असे तिचे म्हणणे आहे. यावेळी बारीपाडा नगरपालिकेचे अध्यक्ष बादल मोहंती यांनी सांगितले की, ‘लक्ष्मी मुखी आमच्या येथील सफाई कर्मचारी आहेत. काही वैयक्तिक समस्यांमुळे, ती तिच्या मुलाला तिच्यासोबत आणते आणि दररोज तिचे कर्तव्य पार पाडते. मी माझ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या गरजांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, काही अडचण आल्यास आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे त्यांनी सांगितले आहे. हा व्हिडिओ पाहून या अनेकांनी या महिलेला सलाम केला आहे.

हे पण वाचा :

नाशिकमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या

बड्डे आहे भावाचा !!! जल्लोष साऱ्या गावाचा !!!

राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा थेट फडणवीसांना इशारा

राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी कपात केली जाणार ???

आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!