धक्कादायक ! नागपूरमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. यामध्ये जुन्या वादातून नागपूर शहरातील काटोल रस्त्यावर एका तरुणाची भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करुन हत्या (Murder) केली आहे. नारायण गयाप्रसाद द्विवेदी असे हत्या (Murder) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

कुठे घडली हि घटना ?
गिट्टीखदान पोलीस स्टेशन आणि गुन्हेशाखा कार्यालयापासून काही अंतरावरच नारायण गयाप्रसाद द्विवेदी या तरुणाची हत्या (Murder) करण्यात आली. या हत्येप्रकरणी (Murder) गिट्टीखदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके ?
मृत नारायण गयाप्रसाद द्विवेदी हा तरुण शहरातील गजबजलेल्या काटोल रस्त्यावरुन दुचाकीने ड्युटीवर जाण्यासाठी निघाला होता. यावेळी अज्ञात आरोपींनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. यानंतर नारायण द्विवेदी दुचाकीसह रस्त्यावरच कोसळला. हा हल्ला एवढा भयंकर होता कि नारायणाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या आरोपींनी नारायण गयाप्रसाद द्विवेदी याची हत्या (Murder) केल्यानंतर मृतदेहाचा मोबाईलवर फोटो काढून तो मित्राला पाठवला आणि घटनास्थळावरून पसार झाले. आरोपींनी नारायण गयाप्रसाद द्विवेदी याची नेमकी कोणत्या कारणामुळे हत्या (Murder) केली याचा तपास पोलीस करत आहेत.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार