व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

खेडमध्ये लग्नाच्या वरातीमध्ये दारूवरुन झालेल्या भांडणातून तरुणाची हत्या

खेड : हॅलो महाराष्ट्र – खेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये लग्नाच्या वरातीत दारू पिऊन भांडणे केल्याच्या वादातून कडधे येथे एका युवकाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या व्यक्तीला मारहाण केल्यानंतर त्याला आरोपींनी चासकमान डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिले. दोन दिवसांनंतर या मृत व्यक्तीचा मृतदेह सापडला. शंकर शांताराम नाईकडे असे हत्या (Murder) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुदेव बोंबले, पवन बोंबले, स्वप्नील सावंत, निलेश नाईकडे, ऋषिकेश उर्फ लखन नाईकडे, विलास परसुडे अशी या आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण ?
मंगळवारी कडधे गावात रात्रीच्या सुमारास एका लग्नाची वरात सुरु होती. त्यापूर्वी चास तेथील एका बारमध्ये वाद झाला, मात्र भांडणे नको म्हणून त्या ठिकाणी वाद मिटवला आणि हे सहा जण वरातीला निघून गेले. मात्र त्या ठिकाणी ही शंकर नाईकडे आला व त्याने काही युवकांकडे दारूची मागणी केली. तसेच नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसून धक्काबुक्की करू लागला. यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले.

यानंतर आरोपींनी शंकर याला वरातीमधून बाजूला नेले. अंधारात त्याच्यावर चहुबाजूंनी जोरदार हल्ला चढवला. त्याच्यावर दगड, विटांनी डोक्यावर मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर शंकर निपचित पडला. यानंतर या आरोपींनी शंकरला एका वाहनात घालून गावाच्या बाहेरून वाहणाऱ्या चासकमानच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात फेकून दिले. यानंतर दोन दिवसांनी शंकरचा मृतदेह सापडला होता.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं