भागलपुर- गुवाहाटी एक्सप्रेसमध्ये बंगालमधील युवकाची गळा चिरून हत्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |Bihar News राजस्थानमधील बीकानेर ते गुवाहाटी जाणाऱ्या ‘गुवाहाटी एक्सप्रेस’ ट्रेनच्या कोच एस-9 मधून प्रवास करणाऱ्या 48 वर्षीय इसम ट्रेनच्या बाथरूममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नवगछिया रेल्वे स्टेशनवर सदर ट्रेन रेल्वे तिकीट तपासनीस, आरपीएफ व जीआरपीचे जवान घटनास्थळी पोहोचले. सदर इसमाला पुढील उपचारासाठी नवगछिया हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. हॉस्पीटलमध्ये पोहोचण्याच्या दरम्यान सदर इसमाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. आधार कार्ड व मोबाईल फोनवरून त्या इसमाची ओळख पटली आहे. सदर मृत इसम बंगालचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. रेल्वे पोलीस मृत इसमाच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सदर इसमाचा गळा चिरला होता आणि पोटाची आतडी बाहेर आली होती. त्यामुळे ट्रेनच्या बाथरूममध्ये सर्वत्र रक्त वाहात होते. मात्र हा तरुण कोणत्या स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढला याबाबत माहिती मिळाली नाही. खगरिया स्टेशन सोडल्यानंतर ट्रेन कटिहार बरौनी रेल्वे क्षेत्राच्या बिहपूर स्टेशनवर आली तेव्हा एका प्रवाशाला ट्रेनच्या बाथरूमभोवती रक्त दिसले. त्याने ही माहिती टीसीला दिली.
त्यानंतर नवगछिया आरपीएफ आणि जीआरपीला टीटीमार्फत याची माहिती देण्यात आली. ट्रेन 12:04 च्या सुमारास नवगछिया स्टेशनवर पोहोचली. गाडी येताच जीआरपी आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले. यासोबतच रेल्वेचे डॉक्टरही घटनास्थळी पोहोचले. तरुणाची गंभीर स्थिती पाहून त्याला तात्काळ नवगचिया उपविभागीय रुग्णालयात पाठवण्यात आले मात्र रुग्णालयात पोहोचताच तरुणाचा मृत्यू झाला. रेल्वे डीएसपीने सांगितले की, प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचे दिसते. त्याची पडताळणी केली जात आहे.