आमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा बनणार सीक्वल; ‘सरफरोश-२’ CRPF जवानांना समर्पित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाचा सिक्‍वल येणार आहे. विशेष म्हणजे चित्रपट निर्माता जॉन मॅथ्यू मॅथन यांनी हा चित्रपट केंद्रीय राखीव पोलीस दलास (CRPF) समर्पित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मॅथन यांच्या १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरफरोश’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

या चित्रपटाच्या सीक्‍वलबाबत जॉन मॅथ्यू मॅथन म्हणाले की, ‘सरफरोश २’चे पटकथा पूर्ण करण्यापूर्वी ती मी पाच ते सहावेळा लिहून काढली आहे. वास्तवमध्ये ही ‘सरफरोश २’ची पाचवी पटकथा आहे. या पटकथेला आता अंतिम रूप देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाचा सिक्‍वल हा भारताच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर आधारित आहे.

यात विविध समस्या निर्माण होत असतानाही भारताची सुरक्षा व्यवस्था मजबूत असल्याचे दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील कलाकार अद्याप निश्‍चित करण्यात आलेले नाही. ‘सरफरोश’ चित्रपटामध्ये देशप्रेम, देशभक्ती, त्याग, समर्पण यांचे चित्रण आहे. याशिवाय आमिरनं वठवलेली एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ‘सरफरोश’मध्ये आमिर खानसह नसरुद्दीन शाह यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आता या सीक्‍वलमध्ये कोण-कोण कलाकार दिसणार आहे याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment