हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला होता. यावेळी कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं म्हणताना मोदींना अश्रू अनावर झाले होते. सोशल मीडियावर मोदींचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. दरम्यान आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी आधीच याबाबत भविष्यवाणी केली होती.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं भाकित २१ मे रोजी खरं ठरलं, असं आपनं पत्रकात नमूद केलं आहे. १७ एप्रिल रोजी संजय यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी ‘अजून थोडे दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावुक झाले आणि रडू लागले याबद्दलच्या बातम्या दाखवतील,’ असं म्हटलं होतं.
जो 17 अप्रैल को बोला था
21 मई को सच हो गया।
देश को एक संवेदनशील नेक दिल इंसान चाहिये
ढोंगी प्रधानमंत्री नही जो खुद रैली करके कोरोना फैलाए और बाद में रोने का नाटक करे। pic.twitter.com/lDvQQmvlmw— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) May 21, 2021
देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाची व्यक्ती हवीय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नको, ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन कोरोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचं नाटक करत आहेत,’ अशा शब्दांत संजय सिंह यांनी शरसंधान साधलं आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.