आर्यन खान विदेशी ड्रग तस्करांच्या संपर्कात; मोबाईलमधून अतिशय आक्षेपार्ह तपशील समोर – NCB

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून आर्यन खानला एनसीबीनं किल्ला कोर्टात हजर केलं आहे. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे.

“आर्यन खानसह तिन्ही आरोप नेहमी एका इग्स तस्काराकडून ड्रग्स घेत होते.. आरोपीच्या मोबाईलमधून ड्रग्ससंद्रभातील चॅट सापडले आहे. यृत्यामधून धक्कायदायक माहिती पुढे आली असून काही जणांची नावे देखील समोर आली आहेत. त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. आरोपी हैं विदेशातील नागरिकांच्या संपर्कात असून त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे एनसीबीकडून तिन्ही आरोपींचा एनसीबी कोठडी मागण्यात आली आहे.

आर्यनच्या फोनमधील चॅटमध्ये काही कोडनेम आढळून आली आहेत. त्यांचा उलगडा करण्यासाठी त्याची कोठडी मिळायला हवी. मोबाईलमध्ये सापडलेल्या लिंक्स आणि त्यामागचं रॅकेट उजेडात आणण्यासाठी कोठडी गरजेची आहे. ड्रग्ज तस्करांशी व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून आपत्तीजनक चॅट करण्यात आलं आहे. या प्रकरणातही छापेमारी सुरू आहे,’ अशी माहिती अनिल सिंह यांनी न्यायालयाला दिली.

Leave a Comment