आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगई यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आसामचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगई (Tarun Gogoi) यांचे गुवाहाटी येथे आज उपचारांदरम्यान निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. त्यानंतर गोगोई यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तरुण गोगोई यांनी आसाममध्ये सलग तीन टर्म मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले होते. काँग्रेसमध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य पातळीवर महत्वाच्या पदांवर काम केले होते.

गोगई यांच्या निधनाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी माहिती दिली. आज सकाळी गोगई यांची प्रकृती खालावल्याने राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपला नियोजित कार्यक्रम रद्द दिब्रुगढ येथून ते गुवाहाटी येथे निघाले होते. तरुण गोगोई हे 25 ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. कोरोनावर मात केल्यानंतर 2 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. तेव्हापासून गोगोई यांच्यावर GMCH रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तरुण गोगोई हे 2001 ते 2016 पर्यंत सलग तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे वयाच्या 84 व्यावर्षी निधन झाले. आसामध्ये ते 2001 ते 2016 पर्यंत सत्तेत होते. सलग तीन टर्म सत्तेत असणाऱ्या गोगोई यांची राजकीय कारकीर्द पन्नास वर्षांपेक्षा जास्त होती. तरुण गोगोई यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तरुण गोगोई यांना श्रद्धांजली

तरुण गोगोई हे लोकप्रिय नेते आणि कुशल प्रशासक होते. केंद्र आणि आसामच्या राज्य सरकारमध्ये त्यांना कामकाजाचा अनुभव होता. गोगोई यांच्या कुटुंबीयांसोबत दुख:द प्रसंगी असल्याचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी तरुण गोगोई यांना आंदरांजली वाहिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment