अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदेंसमोरच आदित्य ठाकरेंना दिले हे आव्हान; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आज शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरूनच थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिले. “विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री शाह साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो छापून निवडणूक लढवली. तुम्ही तिकडे राजीनामा द्यावा, मी सिल्लोडमध्ये इकडे राजीनामा देतो. मग थेट लढूया, तेव्हा कळेल कोण गद्दार आहे, असे सत्तार यांनी म्हंटले आहे.

आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज जाहीर सभा पार पडली. या सभेत आ. सत्तार यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी राजकारणामध्ये मंत्री झालो होतो. मी आमदार झालो, त्यावेळेस मी इतकी पब्लिक कधी पाहिली नाही. इतका फुलांचा वर्षाव, इतकं प्रेम लोकांकडून मिळतंय. गेल्या काही दिवसात काही लोकांकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याचं पाप झालं त्याचं उत्तर हे आहे.

पुढे सत्तार म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की सर्व जनता याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही गद्दार आहात, राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकांना समोरे जा, असे आव्हान या बंडखोर आमदारांना देत आहात. सुरूवातीला तर या आमदारांनी धीरानं घेतलं. मात्र, आता हे आमदार आता तुमच्या विरोधात आक्रमक झाले असल्याचे सत्तार यांनी म्हंटले.