गड आला पण सिंह गेला ; बागडेंच्या पराभवानंतर सत्तारांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व असलेले माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत सपाटून पराभव झाला. यानंतर गड आला पण, सिंह गेला अशा शब्दांत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीतील पॅनलमध्ये शेतकरी विकास पॅनल हा शिवसेना सहीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस असा होता. ज्यांचे नाव मतदान यादीमध्ये नव्हते असेच लोक तिकडून नेतृत्व करत होते. सर्व एकत्रित आले आणि सर्वांना जो धोबीपछाड दिला, यावरून त्यांनी त्यांचे मूल्यमापन करावे.

पुढे बोलताना सत्तार म्हणाले, मला खूप दु:ख होत आहे, बागडे हे ज्येष्ठ नेते होते, आमच्या प्रचाराचे ते प्रमुख होते. त्यांचा विजय व्हायला हवा होता. परंतु गड आला पण सिंह गेला अशा पद्धतीने आमचे सीट काही थोड्या-थोड्या मताने पडले. परंतु पराभव हा स्वीकारावा लागतो.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment