‘अभाविप’ने उधळली पुणे विद्यापीठाच्या ‘मॅनेजमेंट कौन्सिल’ची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. गेल्या मार्च २०२० मध्ये संपूर्ण देशभरात कॉविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ताळेबंदी लावण्यात आली होती, या सत्राची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल जाहीर करण्यात आला होता, या दरम्यान कोणतीही ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली नव्हती तरी देखील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागले.

कोविड – १९ मूळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. जर परीक्षाच झाली नाही तर मग परीक्षा शुल्क कशासाठी? असा प्रश्न अभाविपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन विद्यापीठाच्या ‘व्यस्थापन परिषद’ बैठक उधळून केला आणि विद्यार्थी हिताचे निर्णय करावे अशी मागणी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. या मागणीसाठी कार्यकर्ते आज सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनिकेत कॅन्टीन या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी मोर्चा काढला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिवाजी सभागृहामध्ये सुरू असणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून ही बैठक उधळून लावली या आंदोलनाची मुख्य मागणी परीक्षा झालेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करावी अशी होती, या सोबतच विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त इतर खाजगी कार्यक्रमांसाठी खर्च करत आहे असा आरोप ही कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला.

या आंदोलनाची दखल घेत विद्यापीठाच्या “व्यवस्थापन परिषद” बैठकीत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय करण्यात आला आणि अभाविपच्या मागणीला यश आले.”गेल्या शैक्षणिक वर्षाची परीक्षा झालेली नसताना विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेण्यात आले होते, परंतु विद्यापीठ प्रशासन कोणताच निर्णय घेत नाही त्यामुळे आशा स्वरूपाचे तीव्र आंदोलन करावे लागले असे मत महाराष्ट्र प्रदेश सहा मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केले. अभाविप वारंवार परीक्षा शुल्क परत करावे ही मागणी मा. कुलगुरू यांच्याकडे करत होती. परंतु विद्यापीठाने कोणताच निर्णय घेतला नाही, आज बैठक उधळल्यावर परीक्षा शुल्क परत देणार असा निर्णय करण्यात आला, सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांच्या मागणीसाठी आंदोलन करावे लागत आहे अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितार्थ निर्णय होत नाही” असे मत यावेळी अभाविप पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी व्यक्त केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment