विशेष प्रतिनिधी । अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिजित बॅनर्जी, इस्थर डफलो, मायकल क्रेमर अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
याआधी अर्थशास्त्रातला नोबेल देऊन अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना देण्यात आला होता. त्यांच्यानंतर प्रदीर्घ काळाने भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे.या पुरस्कारामुळे सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान अभिजीत बॅनर्जी ५८ वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म कोलकात्याचा आहे. अभिजीत बॅनर्जी यांचं शिक्षणही याच शहरात झालं आहे. त्यांनी कोलकात्यात साउथ पॉइंट स्कूल आणि प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले.१९८१ मध्ये त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये एम.ए. केले. त्यानंतर १९८८ मध्ये ते हॉर्वर्डमध्ये पीएच. डी. करण्यासाठी गेले. Essays in Information Economics या विषयावर त्यांनी पी.एच. डी. केली आहे.