धुळे : मनपा वसुली विभागातील लिपीक 2800 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी । महानगर पालिकेतील वसुली विभागातील लिपीकाला 2800 रुपयांची लाच घेताना अँन्टी करप्शन ब्युरो पथकाने सापळा रचुन अटक केली.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार , तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीच्या नावे असलेले सुपडू अप्पा कॉलनीतील मातीचे घर पाडुन त्या जागेवर आर.सी.सी. बांधकाम केले. सुधारीत घरपट्टी पावती मिळण्याकरीता धुळे मनपा येथील वसुली विभागातील लिपीक जितेंद्र वसंत जोशी यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती 2800 रुपयांची मागणी केली. त्यानुसार सापळा रचुन 2700 रुपये ऱोख रक्कम लाच घेताना मनपा वसुली विभागात लिपीक जितेंद्र वसंत जोशी यांना लाचलुचपत विभाग अधिकारी कारवाई करुन अटक केली.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक सुनिल कुराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण,व पथकातील पो.कॉ.जयंत साळवे,पो.ना.संतोष हिरे,सुधीर सोनवणे,संदिप सरग,कृष्णकांत वाडिले,भुषण खलाणेकर,प्रशांत चौधरी,कैलास जोहरे,प्रकाश सोनार,शरद काटके,संदिप कदम,भुषण शेटे,सुधीर मोरे,अशांनी सदरची कारवाई केली आहे.

Leave a Comment