देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा अपघात; 5 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनास जात असलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला असून यामध्ये पाच भाविक जागीच ठार झाले आहेत. तर चार जण जखमी झाले आहेत. भक्तांच्या गाडीची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला.

आज पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव – जालना महामार्गावर बोलेरो गाडी आणि ट्रकमध्ये भीषण धडक झाल्याने अपघात झाला. मृतांमध्ये बोलेरो चालक, एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

मृत भाविक हे जालना जिल्ह्यातील अंबड गावचे आहेत. अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. जखमींवर देऊळगाव राजा आणि जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Comment