व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 17 महिलांना कारने उडवलं, 5 जणींचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा येथे भीषण अपघाताची आहे. रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 17 महिलांना जोरात धडक दिल्याने यामध्ये 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने खासगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळ असलेल्या शिरोली परिसरात सोमवारी रात्री ही अपघाताची घटना घडली. पुणे बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने महिलांना जोरदार धडक दिली.

पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी रात्रीच्या सुमारास या महिला येत होत्या. त्याचवेळी महिंद्रा कंपनीच्या कारने या महिलांना रस्ता ओलांडताना धडक देन वाहन चालक रस्ता दुभाजक तोडून वाहनासह फरार झाला.