गोटे गावच्या हद्दीत आंबे घेवून जाणाऱ्या गाडीला अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील पुणे- बंगळूर महामार्गावर गोटे गावाजवळ आंबे घेवून जाणाऱ्या मालवाहतूक गाडीचा अपघात झाला. शनिवारी (दि.15 मे) सकाळी सात वाजता हा अपघात झाला. घटनास्थळी हायवे हेल्पलाइने मदत केली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रत्नागिरी येथून पुण्याला आंबे घेवून जाणाऱ्या गाडी क्रमांक (एमएच- 08 – एपी- 2740) गाडीचा अपघात झाला. गाडी चालकांचा ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. गाडी पटली झाल्याने आंब्याच्या पेट्या रस्त्यांच्या कडेला सर्वत्र पसरलेल्या होत्या.

गाडी पलटी झाल्याने गाडीतील दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, मानसिंग सुर्यवंशी, योगेश पवार, अमित पवार, जितेंद्र भोसले यांनी मदत केली.

Leave a Comment