व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Accident : भरधाव ट्रेनची ट्रकला धडक; अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  काही अपघात (accident) अतिशय भीतीदायक आणि थरकाप उडवणारे असतात. विशेषतः ट्रेनचे अपघात (accident) तर अतिशय भयानक असतात, जे पाहूनच अंगावर काटा येतो. सध्या अशाच एका ट्रेनच्या धक्कादायक अपघाताचा (accident) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका भरधाव ट्रेनने एका ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात (accident) घडला आहे.

काय घडले नेमके ???

कर्नाटकातातील बिदर रेल्वे क्रॉसिंगवर अडकलेल्या ट्रकला ट्रेनने धडक दिल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एएनआयने ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की ट्रेन ट्रकला धडकण्याआधी तिथे असलेले लोक रूळावरुन पळ काढतात. यामुळे सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र त्या ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. ही धडक झाल्यानंतर प्रवासी ट्रेनचा वेग कमी झाल्याचं पाहायला मिळतं. यानंतर ट्रेन घटनास्थळापासून काही मीटर अंतरावरच जाऊन थांबली. ट्रेन ट्रकला धडकल्यानंतर ट्रेनच्या ड्रॉयव्हरने अर्जंट ब्रेक मारून ट्रेन थांबवली. हि संपूर्ण अपघाताची (accident) घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे पण वाचा :

Stock Market : ‘या’ 5 शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला भरघोस नफा !!!

HDFC Bank च्या ग्राहकांना धक्का !!! बँकेने आजपासून लागू केला हा नवा नियम

PPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने केले ‘हे’ मोठे बदल

Aadhar Card चे व्हेरिफिकेशन करणे महत्वाचे का आहे ??? समजून घ्या

Share Market मध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करावे हे समजून घ्या