अपघात करून पळून गेली महिला, आता 6 वर्षाच्या मुलांनी बनवलेल्या पेन्सिल स्केचद्वारे पोलिस घेत आहेत शोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बर्लिन जर्मनीच्या हॅम (Hamm) शहरात पोलिसांनी धोकादायक कार चालविणार्‍या महिलेला शोधण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला आहे. 6 वर्षाच्या मुलांनी बनविलेल्या पेन्सिल स्केचद्वारे बॅरिकेड्स तोडून पळून गेलेल्या महिला ड्रायव्हरचा पोलिस शोध घेत आहेत. डेली मेलच्या एका वृत्तानुसार, हॅमच्या शाळेत जात असताना अपघात पाहून चार मुलांनी पेन्सिल घेत स्केचेस बनविली. मुलांनी बनविलेल्या या आता स्केच दोषींना पकडण्यासाठीच्या तपास फाईलचा एक भाग बनल्या आहेत.

पोलिसांच्या अहवालानुसार, ड्रायव्हर ही एक महिला असून ती रस्त्याच्या बॅरिकेड्सवरुन पळून गेली आणि फरार झाली. ज्यावेळी महिलेकडून ही घटना घडली त्यावेळी काही मुले रस्त्यावरुन जात होती. यावेळी त्यांनी त्या बाईला पाहिले.

कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीने आपल्या निवेदनात दोन स्केचेस शेअर करताना म्हंटले आहे की, “ड्रॅगन क्लासचे लुईसा, रोमी, सेलिना आणि लुईस ड्रॅगन ग्रुपच्या विशेष पोलिस कौतुकास पात्र आहेत. पादचारी ट्रॅफिक लाइटवर हिरव्या सिग्नलच्या प्रतीक्षेत असताना सकाळी जवळपास 8:45 वाजताच्या सुमारास मुलांनी काळ्या रंगाच्या कारला बॅरिकेड्सला धडक मारताना पाहिले. ‘ या निवेदनात पुढे असे म्हटले गेले आहे की, लहान ब्लॉन्ड केस असलेल्या ड्रायव्हरने झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष केले आणि पुढे गेले.

https://twitter.com/polizei_nrw_ham/status/1327170870188658688?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1327170870188658688%7Ctwgr%5E&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fworld%2Fgermany-6-year-old-kid-draw-sketches-to-help-cops-driver-responsible-for-road-accident-3339776.html

वास्तविक, मुलांनी त्यांच्या शिक्षकांना घटनेबद्दल सांगितले. त्यांनी याबाबत जिल्हा पोलिसांना पुन्हा माहिती दिली. पोलिसांनी हे पेन्सिल स्केच सोशल मीडियावर अपलोड केले आणि महिला ड्रायव्हरची ओळख पटविण्यासाठी अपोफ्रेस्टेस / होर्स्ट्रेस चौकात अपघाताविषयी लोकांना माहिती देण्याचे आवाहन केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment