अकाउंट एग्रीगेटर नेटवर्क बदलणार पैसे वाचवण्याचा मार्ग, आता कर्ज आणि गुंतवणूक क्षेत्रात होणार मोठा बदल; कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । नुकत्याच सुरू झालेल्या अकाउंट एग्रीगेटरच्या मदतीने, वित्तीय संस्थांना आर्थिक माहिती डिजिटल पद्धतीने शेअर करून, सामान्य लोकं आणि लघु व्यवसाय कोणत्याही अडचणीशिवाय बँकांकडून कर्ज मिळवू शकतात. अकाउंट एग्रीगेटरबाबत अर्थ मंत्रालयाकडून वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नाच्या (FAQ) उत्तरात म्हंटले गेलं की,” गेल्या आठवड्यात सादर करण्यात आलेली आर्थिक डेटा -शेअरिंग सिस्टीम – अकाउंट एग्रीगेटर (AA) इन्व्हेस्टमेंट आणि क्रेडिट सेक्टरमध्ये क्रांती आणू शकते आणि कोट्यवधी ग्राहकांना त्यांच्या आर्थिक नोंदींमध्ये सहजपणे एक्सेस आणि नियंत्रण मिळवण्यास मदत करू शकते. FAQ नुसार, या उपक्रमामुळे कर्जदेणाऱ्या आणि फिनटेक कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ होईल.

मोठ्या बँकांमध्ये अकाउंट एग्रीगेटर सिस्टीम सुरू करण्यात आली आहे
बँकिंगमधील अकाउंट एग्रीगेटर सिस्टीम देशातील आठ सर्वात मोठ्या बँकांसोबत सुरू करण्यात आली आहे. अकाउंट एग्रीगेटर सिस्टीम कर्ज आणि पैशाचे व्यवस्थापन अतिशय जलद आणि किफायतशीर बनवू शकते. अशी सुविधा देणारे अनेक अकाउंट एग्रीगेटर असतील आणि ग्राहक त्याला हवे ते निवडू शकतो. अर्थ खात्याने म्हटले आहे की,”बँक खात्याच्या तपशिलांची प्रत्यक्ष स्वाक्षरी केलेल्या आणि स्कॅन केलेल्या प्रती शेअर करणे, नोटरीद्वारे स्वाक्षरी केलेली किंवा शिक्का मारलेली कागदपत्रे मिळवणे किंवा थर्ड पार्टीला आपली आर्थिक विवरणे देताना उद्भवणाऱ्या अडचणींच्या बदल्यात अकाउंट एग्रीगेटर करणारे नेटवर्क डिजिटल माहिती त्यांच्यासाठी सोप्या, मोबाइल-आधारित आणि सुरक्षित पद्धतीने एक्सेस सुनिश्चित करते.

या बँकांनी सुरू केली सुविधा
यासाठी बँकेला फक्त अकाउंट एग्रीगेटर नेटवर्कशी जोडणे आवश्यक आहे. आठ बँका आधीच संमतीच्या आधारे डेटा शेअर करत आहेत. यापैकी चार बँका – एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि इंडसइंड बँक यांनी ही सुविधा सुरू केली आहे. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि फेडरल बँक या चार बँका लवकरच ही सुविधा सुरू करणार आहेत. आधार eKYC आणि CKYC केवळ नाव, पत्ता, लिंग इत्यादी ओळख आधारित माहिती शेअर करतात. त्याचप्रमाणे, क्रेडिट ब्यूरो डेटा फक्त लोन हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोअर दर्शवितो. दुसरीकडे, अकाउंट एग्रीगेटर नेटवर्क, सेव्हिंग्स, डिपॉझिट्स किंवा करंट अकाउंटमधून व्यवहाराची माहिती शेअर करण्यास अनुमती देईल.

Leave a Comment