‘कराड जनता बँक’ दिवाळखोरीत गेली नसून तिची ठरवून लुट केलीय; खातेदार राजेंद्र पाटलांनी मांडला ‘कच्चा चिठ्ठा’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेली ‘दि कराड जनता सहकारी बँक’ दिवाळखोरीत गेल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने सदर बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. यानंतर कराड जनता सहकारी बँक दिवाळखोरीत निघाली नसून रिझर्व्ह बँक, सहकार खाते आणि संचालक मंडळाने ठरवून पद्धतशीरपणे बँकेची लुट केली असल्याचा आरोप बँक खातेदार राजेंद्र पाटील यांनी केला आहे. महत्वाची बाब म्हणजे राजेंद्र पाटील 2015 साली बँकेत बोगस कर्ज वाटप होत असल्याबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणारे बँक खातेदार आहेत.

एकूण 550 कोटी ठेवी असणाऱ्या कराड जनता सहकारी बँकेतून 425 कोटी कर्ज वाटप झाले. त्यातील चारच खाते दारांना 390 कोटींचे बोगस कर्ज वाटप करण्यात आले. या कर्जात आजपर्यंत एक रुपायाही परत आला नाही. याकडे वेळीच रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली. मात्र, पद्धतशीर दुर्लक्ष करण्यात करण्यात आल्याचा आरोप राजेंद्र पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कराड जनता बँकेला नेमकं कुणी बुडवलं अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

दरम्यान, सहकाराच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या कराड जनता सहकारी बँकेचे हजारो ठेवीदार आहेत. या बँकेवर 2017 साली रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. त्यानंतर आता ही बँक दिवाळखोरित गेल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ही अधिकृत घोषणा सहकार आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे या घोषणेनंतर आता ठेवीदारांच्या पैशांचं काय?, असा सवाल आता ठेवीदार विचारात आहेत.  (account holder Rajendra Patil has alleged Karad Janata Bank was robbed by the Reserve Bank Co-operation Department)

बँक संचालकांवर तब्बल 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा
दि कराड जनता सहकारी बँकेचा व्याप मोठा आहे. सहकारातून उभ्या राहिलेल्या या बँकेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच मुंबई येथे शाखा आहेत. या बँकेच्या महाराष्ट्रात एकणू 29 शाखा आहेत. तर सध्या या बँकेचे 32 हजार सभासद आहेत. सभासदांची संख्या लक्षात घेता या बँकेचा व्याप मोठा असल्याचे लक्षात येते. मात्र, बँकेच्या संचालकांवर 310 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याशिवाय याप्रकरणी गुन्हाही संचालकांविरोधात नोंदविण्यात आला होता. त्यानंतर 2017 साली रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध घालण्यात आले होतेे. यानंतर या बँकेच्या अर्थकारणाचा आलेख घसरल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment