बॉलीवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ते एक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होते.

त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून “आज सकाळी कोरोनामुळे अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते. त्यांनी बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांना मनापासून संवदेना.” अशा प्रकारे शोक व्यक्त केला आहे.

बिक्रमजीत कंवरपाल यांनी २००३ पासून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांनी पेज ३, रॉकेट सिंगः सेल्समॅन ऑफ द ईअर, आरक्षण, मर्डर २, २ स्टेट्स आणि द गाजी अटॅक या हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांनी दीया और बाती हम, ये हैं चाहतें, दिल ही तो है आणि २४ या मालिकेतसुद्धा काम केले आहे.

You might also like