इतिहासांच्या पानांमध्ये दडलेली महागाथा..! अभिनेता प्रसाद ओक उलघडणार सुवर्ण इतिहासाचे पान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी २ ऐतिहासिक आणि मराठी चित्रपटांच्या घोषणा झाल्या आहेत. मुख्य म्हणजे या दोन्ही चित्रपटांचा इतिहास मराठी साम्राज्यातील सरसेनापतींचा आहे. त्यातील एक ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘भद्रकाली’ अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने या नव्या ऐतिहासिक चित्रपटाची काल घोषणा केली. मराठा साम्राज्यातील पहिल्या वहिल्या महिला सरसेनापती अर्थात ‘सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे’ यांच्या जीवनाचे भाष्य करणारा हा चित्रपट असणार आहे. सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी मराठा साम्राज्याच्या सीमा गुजरातपर्यंत विस्तारल्या होत्या. तर त्यांच्या पत्नी उमाबाई दाभाडे यांनी हे साम्राज्य मरणोत्तर राखले. हाच सुवर्ण पानांवर रेखाटलेला इतिहास या चित्रपटात दाखवला जाणार आहे.

https://www.instagram.com/p/CPxGjAwg4sS/?utm_source=ig_web_copy_link

दिग्दर्शक प्रसाद ओक याने या आगामी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करत याबाबतची माहिती दिली. त्याने हि पोस्ट शेअर करत लिहीले आहे कि, “भद्रकाली”…शिवराज्याभिषेकाने प्रस्थापित झालेले मराठी साम्राज्य सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी गुजरात पावेतो भिडवले…ते आपल्या अद्वितीय पराक्रमाने राखणाऱ्या … मराठा साम्राज्यातील “एकमेव” महिला सेनापती “श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे”….यांची इतिहासांच्या पानांमध्ये दडलेली महागाथा…’. तसेच यापुढे लिहिताना त्याने या चित्रपटास नावारूपास आणणाऱ्या किमयागारांच्या नावांचा उल्लेख केला आहे.

https://www.instagram.com/p/CPypHxfgTZW/?utm_source=ig_web_copy_link

प्रसिद्ध निर्माते पुनीत बालन हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर प्रसिद्ध लेखक दिग्पाल लांजेकर हे या ऐकतिहासिक चित्रपटाचे लेखन करणार करणार आहेत आणि अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध संगितकार अजय- अतुल हे या चित्रपटाला संगीतबद्ध करणार आहेत. मात्र चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. तर टिझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रसाद ओक यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या आणखी एका चित्रपटाची म्हणजेच ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचीही घोषणा केली होती. त्यामुळे प्रसाद ओक एकाच वेळी दोन चित्रपटांचे दिग्दर्शन करणार असून प्रेक्षकांसाठी रंजक कथांचा सोहळा घेऊन येणार आहे, हे नक्की.

Leave a Comment