व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

…. अन् संतापलेल्या रणबीरने चाहत्याचा मोबाईलचं फोडला; नेमकं काय घडलं??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकताच बाप बनलेला बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या हटके स्टाईल आणि जबरदस्त अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. रणबीरचे फॅन्स फॉलोअर्स सुद्धा खूप आहेत. परंतु रणबीरने अशी एक गोष्ट केली ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रणबीरने चक्क रागाच्या भरात आपल्या चाहत्याचा मोबाईलच फेकून दिला आहे. पापाराझी व्हिडिओ मध्ये ही घटना व्हायरल झाली.

नेमकं काय घडलं??

काल रणबीर त्याच्या सहकाऱ्यांसोबत स्टुडिओतून बाहेर पडत होता, तेवढ्यात एक चाहता त्याच्याकडे सेल्फी घेण्यासाठी आला, नेहमीप्रमाणे रणबीर सेल्फी काढण्यास तयार सुद्धा झाला. पण दुर्दैवाने चाहत्याचा फोन बंद पडला. काही वेळ शांत राहिल्यानंतर अचानक रणबीरचा संयम सुटला. यानंतर रणबीरने चाहत्याच्या हातातून फोन काढून फेकून दिला. रणबीरच्या या कृतीने सगळेच अवाक् झाले.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रणबीर कपूर पुन्हा ट्रेंडमध्ये आला आहे. खरं तर बॉलीवूड सेलिब्रिटी सहसा त्यांच्या चाहत्यांशी भांडताना दिसतात, परंतु रणबीर कपूरने असे काहीतरी केले आहे हे त्याच्या चाहत्यांना पचवणे कठीण जात आहे.

रणबीर सहसा खूप शांत असतो आणि अनेकदा तो चाहत्यांसह फोटो क्लिक करताना सुद्धा दिसला आहे. त्यामुळे त्याच हे अचानकपणे अस वागणं त्याच्या आगामी भूमिकेचा हा परिणाम आहे असे मानायचे का? रणबीर खरच आपल्या नवीन व्यक्तिरेखेतून बाहेर यायला विसरला आहे का? किंवा तो त्याच्या नवीन पात्रात इतका गुंतला आहे की तो रील आणि वास्तविक यात फरक करू शकत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, या घटनेवर रणबीर कपूरने अद्याप कोणतेही जाहीर वक्तव्य केलेले नाही. त्याच्या अशा वागण्यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. पण तो लवकरच याबाबत आपली प्रतिक्रिया देईल अशी अपेक्षा आहे. तर ज्या चाहत्याबरोबर ही घटना घडली आहे त्यानेही याप्रकरणी आत्तापर्यंत मौन बाळगले आहे. त्यामुळे नेमकं काय प्रकरण आहे याबाबत आपण सध्या तरी फक्त प्रतीक्षा करू शकतो.