बीएमसीने माझ्याशी भेदभाव केला ; सोनू सूदने केला आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शक्तीसागर इमारत ही १९९२पासून उभी असून ती बेकायदा नाही. मी ही इमारत २०१८-१९मध्ये घेतली होती. तशी कागदपत्रेही आहेत. ही इमारत आहे तशीच आहे आणि त्यातली एक खिडकी सुद्धा १९९२पासून तोडण्यात आलेली नाही,’ असा दावा अभिनेता सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

‘महापालिकेने एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ अन्वये नोटीस बजावताना त्यात कथित अनधिकृत बांधकामाचा कोणताच तपशील दिला नाही, अगदी अस्पष्ट स्वरूपाची नोटीस दिली. तरीही मी माझ्याकडील कागदपत्रे देऊन उत्तर दिले. नोटीस बजावताना आवश्यक मुदत आणि सर्व तपशील दिला जातो, मात्र माझ्याच बाबतीत पालिकेने भेदभाव केला असून काही तपशीलच दिला नाही,’ असा आरोप न्यायालयात सोनू सूदचे वकिल अमोघ सिंग यांनी केला आहे.

दिंडोशी कोर्टाने माझ्या १५ पानी सविस्तर उत्तराचा विचारच न करता आणि कारणमीमांसा आदेशात न मांडताच माझा अर्ज फेटाळणारा आदेश दिला आहे. हे अत्यंत चुकीचे आहे आणि सविस्तर आदेश देण्याच्या उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निवाड्यांचेही पालन केलेले नाही,’ असा युक्तीवाद सोनू सूदच्या वकिलांनी केला.

इमारतीची मालकी माझ्याकडे नसती तर मला स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेने कर्जच दिले नसते. या इमारतीच्या माध्यमातून जो पैसा येतोय तो मी सामाजिक कामांसाठी वापरतोय. लॉकडाउन काळात पोलिस कर्मचारी रात्रंदिवस काम करत असल्याचे पाहून मी ही संपूर्ण इमारत त्यांच्यासाठी दिली होती’, असं स्पष्टीकरण सोनू सूदनं दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment