इरफान खानच्या ‘या’ डायलॉगवर आजही प्रेक्षक न राहून टाळ्या वाजवतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता इरफान खान निधनाच्या वृत्ताने संपूर्ण सिनेजगत शोकसागरात बुडालं आहे. त्याच्या अकाली जाण्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅन्सरशी लढा देत होते. कॅन्सरवर मात करत भारतात परतल्यानंतर इरफान खान पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करेल असा विश्वास सगळ्यांना होता. मात्र वयाच्या ५३ व्या वर्षी इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफान खान यांचा शेवटचा चित्रपट ठरला. अभिनय आणि अनोख्या अंदाजामुळे त्यांनी जगभरात नाव कमावलं. आपल्याला दिली जाणारी भूमिका महत्त्वपूर्ण आहे का याचा तो फार विचार करत नव्हता. मिळणाऱ्या प्रत्येक भूमिकेचं सोनं कसं करायचं याचं कसब त्यांच्याकडे होतं. नायक असो किंवा खलनायक प्रत्येक भूमिका कशी जीवंत करायची हे इरफान यांना बरोबर माहीत होतं. सिनेमातील त्यांच्या डायलॉगवर अक्षरशः टाळ्या पडायच्या. असेच त्याचे काही अजरामर डायलॉग खालीलप्रमाणे…

१) पान सिंह तोमर- ”बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में.”

२) डी-डे- ”सिर्फ इंसान गलत नहीं होता वक़्त भी गलत हो सकता है”, ”गलतियां भी रिश्‍तों की तरह होती हैं, करनी नहीं पड़ती, हो जाती है.”

३)जज़्बा- ”शराफत की दुनिया का किस्‍सा ही खतम, अब जैसी दुनिया वैसे हम.”, ”मोहब्बत थी इसलिए जाने दिया, अगर जिद होतो तो बाहों में होती.”

४)साहेब बीवी और गैंगस्टर-“हमारी तो गाली पर भी ताली पड़ती है.”

५)लाइफ इन मेट्रो- “ये शहर हमें जितना देता है, बदले में कहीं ज्‍यादा हम से ले लेता है.”

६) हासिल- “और जान से मार देना बेटा, हम रह गये ना, मारने में देर नहीं लगायेंगे, भगवान कसम.”

७)पीकू- “डेथ और शिट, किसी को, कहीं भी, कभी भी, आ सकती है.”

८)मदारी-“तुम मेरी दुनिया छीनोगे, मैं तुम्‍हारी दुनिया में घुस जाऊंगा.”

९)हिंदी मीडियम- ”एक फ्रान्स बंदा, जर्मन बंदा स्‍पीक राँग इंग्‍लिश, वी नो प्रॉब्‍लम, एक इंडियन बंदा से राँग इंग्‍लिश, बंदा ही बेकार हो जाता है जी.”

१०)द किलर- “बड़े शहरों की हवा और छोटे शहरों का पानी, बड़ा खतरनाक होता है.”

११)करीब करीब सिंगल-“टोटल तीन बार इश्‍क किया, और तीनों बार ऐसा इश्‍क मतलब जानलेवा इश्‍क, मतलब घनघोर हद पार.”

१२) हैदर- ”शैतान की सबसे बड़ी चाल ये है, की वो सामने नहीं आता.”

असे बरेच डायलॉग तुम्हालाही माहित असतीलच, इरफानच्या निधनामुळं एक गुणी आणि निखळ अभिनय आनंद देणारा  कलाकार आज आपल्यातून निघून गेला मात्र, या कलाकारानं दिलेल्या आठवणी सदैव चित्रपट रूपानं आपल्या सोबत राहतील..

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment