मुंबईची तुलना POK शी ; ‘या’ कलाकारांनी साधला कंगणावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापासून अभिनेत्री कंगना राणावत भलतीच आक्रमक झाली असून तिने अनेक धक्कादायक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. बॉलीवूड मधील घराणेशाही,ड्रग माफिया याबद्दल वक्तव्य केलेली कंगना आता थेट मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने आणि मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित केल्यामुळे कंगणाला सर्वच स्तरातुन रोषाला जावं लागतं आहे. आत्तापर्यंत बॉलीवूड कलाकार किशोरी शहाणे, सुबोध भावे, उर्मिला मातोंडकर यांनी कंगणावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे, अशा शब्दांत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिला चांगलेच खडसावले आहे.

या वादात आता अभिनेता रितेश देशमुख यानेही उडी घेतली आहे. रितेश देशमुख याने कंगनाला थेट प्रत्युत्तर दिले नसले तरी त्याने सूचक अशी टिप्पणी केली आहे. ‘मुंबई हिंदुस्तान है’ असे त्याने म्हटले आहे.

सई ताम्हणकरने आपल्या ट्विटमध्ये फक्त,’मुंबई मेरी जान!’ असं म्हणतं #कर्मभूमी #ILoveMumbai #विषयसंपला हे हॅशटॅग वापरले आहेत.

कंगनाला चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. केदार शिंदे यांनी ट्विट करताना म्हटले आहे, ‘या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…… #निषेध #kanganavirus

कंगणाच्या या ट्विटवर सुबोध भावेने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. “ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा. जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा”, असं सुबोधने कंगनाला सुनावलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like