Friday, June 2, 2023

अभिनेत्री आसावरी जोशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कलाकारांचे इनकमिंग जोरात सुरू आहे. त्यातच आता भर पडत असून मराठी अभिनेत्री आसावरी जोशी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी 15 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचा घड्याळ हातात बांधणार आहेत.

आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा सोहळा मुंबईत पार पडेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या पक्षप्रवेश सोहळ्यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान आसावरी यांनी याअगोदर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

आपण चित्रपटसृष्टी, कला आणि कलाकार यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे आसावरी जोशी म्हणाल्यात. पुढच्या काळात पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आपल्या क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे आसावरी जोशी यांनी सांगितले.