मला आता गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय – राम कदमांच्या मागणीवर कंगनाच उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच आपल्या रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत असते. सुशांत आत्महत्या प्रकरणात कंगणाने अनेक कलाकारांवर तसेच राजकीय नेत्यांवरही भाष्य केले आहे.तसेच ड्रग माफियांबद्दलही कंगना बोलली होती.

त्यातच भाजपा नेते राम कदम यांनी महाराष्ट्र सरकारने कंगणाला सुरक्षा देण्यासंबंधी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला कंगणाने उत्तर दिलं आहे.“मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने भाजपा नेते राम कदम यांच्या मागणीवर दिलं आहे. यासोबतच “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको ”, असंही कंगना म्हणाली आहे.

“सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे. कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर त्यावर राम कदम यांनी पुन्हा रिप्लाय देताना एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.