क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का ; रोहित शर्माच्या ट्विटवर कंगनाचं वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. शेतकरी आंदोलनाबद्दलची कंगणाची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुचं आहे. आता कंगनानं क्रिकेटपटू रोहित शर्माच्या ट्विटरवरुन क्रिकेट खेळाडूंवर निशाणा साधला आहे. “हे सर्व क्रिकेट खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत?”, अशी टीका केलीय.

कंगना रणौतनं “हे सर्व क्रिकेट खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत” असा सवाल उपस्थित केला. याचवेळी तिन पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केल.”ते दहशतवादी आहेत त्यांच्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांची भीती वाटते हे सांगून टाका, असं आव्हान कंगनानं क्रिकेटर्सना दिलं आहे.

नक्की काय म्हणाला होता रोहित शर्मा –

भारत हा एकसंध असून आपण सर्वजण मिळून समस्येवर मार्ग काढणं ही काळाची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. देशाच्या भल्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतील, असं ट्विट रोहित शर्मा यानं केलं होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like