कोणाचा नवरा कोण यांच्याशी मलिकांना काय करायचं आहे? आमच्यावरील आरोप खोटेच – क्रांती रेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून आरोप केले जात असल्याने अभिनेत्री क्रांती रेडकर व सासरे ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी “नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्या विरोधात टीका केली जात आहे. कोणाचा नवरा कोण आहे यांच्याशी नवाब मालिकांना काय करायचे आहे? समीर वानखेडेंचा वैयक्तिक आयुष्य आणि ड्रग्जचा काय संबंध आहे का? असा सवाल रेडकर यांनी केले आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, नवाब मलिक रोज नवा आरोप करत आहेत. काही कागदपत्रंही दाखवत आहेत. मात्र, त्यांचे सर्व दावे आणि पुरावे खोटे आहेत. त्यात काही तथ्य नाही. आम्ही सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे दाखवले आहेत.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले आम्हाला भेटले हे कुणाला दुर्देवाचे वाटत असेल तर आम्ही जायचे कुठे? एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठी उभे राहने चुकीचे आहे का? आम्ही आठवलेंना सर्व कागदपत्रे दिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे मोठे नेते आहेत. आमच्याही पाठीमागे मोठा नेता आहे. आम्ही त्यांच्या मदतीने तुम्हाला पुरावा देणार आहोत. त्यामुळे समीर वानखेडे फ्रॉड आहेत की नवाब मलिक आहेत हे दिसून येईल.

नवाब मलिकांनी आमची बदनामी करू नका – ज्ञानदेव वानखेडे

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची बभेत घेतल्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी जन्मल्यापासून कधीही धर्मांतर केले नाही. आमच्यावरील खासगी आरोप थांबवा. प्रश्न फक्त ड्रग्जचा आहे. मलिक यांनी त्यांच्या जावयाला अटक केल्यामुळे आम्हाला बदनामी करू नये. तुम्ही कोर्टात जावे आमची बदनामी करू नये.

Leave a Comment