अभिनेत्री प्रिया बापट उतरली साड्यांच्या व्यवसायात; अवाजवी किमतींपुढे चाहत्यांनी टेकले हात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात लॉक डाऊन असल्यामुळे चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. अश्यावेळी अनेक कलाकार वेगवेगळ्या गोष्टीत आपले मन रमवताना दिसत आहेत. कुणी वर्क आउट करतय, तर कुणी चमचमीत-लज्जतदार पदार्थ बनवतय. कुणी घरगुती कामात व्यस्त आहे, तर कुणी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या संगोपनात. एकंदर काय तर सगळेच कलाकार आपापले छंद आणि आपल्या कुटुंबासमवेत मिळालेले विश्रांतीचे क्षण एन्जॉय करत आहेत. पण काही कलाकार आपल्या बीजनेस माईंडला शांतता देण्यापेक्षा काहीतरी हटके आणि नवीन करण्याच्या तयारीत दिसत आहेत. आता प्रिया बापटच पहा. तिने नुकतीच फेसबुक वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यातून स्पष्ट समजून येते की प्रिया आता बिजनेस वूमन होऊ लागली आहे. ती आपल्या बहिणीसोबत डिजाईनर क्लॉथच्या मार्केटमध्ये उतरणार आहे. एक नवा व्यवसाय करीत ती आपली आवड जोपासणार आहे.

प्रियाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझी बहिण श्वेता गेली १० वर्ष फॅशन आणि टेक्सटाइल क्षेत्रात काम करत्ये. गेले काही दिवस ती अनेक कारीगरांच्या संपर्कात आहे आणि त्यातून झालेल्या चर्चेतून श्वेताने पुन्हा एकदा या ब्रँड वर काम करणं सुरू केलं. आणि यात मी सुध्दा तिच्याबरोबर “बराबरकी पार्टनर” झाले आहे. तर येथे Sawenchi तर्फे आम्ही घेऊन येत आहोत हँडलुम साड्यांचं कलेक्शन. चंदेरी, महेश्वरी, काॅटन सिल्क, अजरक प्रिंट मोडाल सिल्क अशा अनेऽऽऽऽऽक प्रकारच्या साड्या. ही पोस्ट पाहिल्यानंतर अगदी कुणीही असच म्हणेल, की वाह प्रिया वाह. पक्की बिजनेस वूमन झालीस. तिने या पोस्ट सोबत या ब्रँडची वेबसाईट देखील पोस्ट केली आहे. ज्यावरून कुणीही अगदी सहज शॉपिंग करू शकेल.

https://www.instagram.com/p/CNmCRaqhEhE/?utm_medium=copy_link

खरतर या व्यवसायाची सुरुवात तिने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली होती. मात्र आता तिने यात पाय घट्ट रोवण्याचे मनाशी पक्के केले असल्याचे दिसत आहे. प्रियाचे या व्यवसाय क्षेत्रातील पहिले पाऊल असून तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.सोबतच तिच्या कलेक्शनचेही कौतुक आहे. मात्र यासोबतच काही चाहत्यांनी तिच्या वेबसाईटवर उपलब्ध असणाऱ्या साड्या आणि ड्रेसेसच्या अवाजवी किमतींबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

एका युजरने कप्तान ड्रेसच्या किंमतीवर अमान्यता दर्शवित सामान्य स्त्री कसे घेणार तुमचे..? कपडे असा प्रश्न तिला केला आहे.. यावर प्रियाने सगळे कपडे हॅण्ड ब्लॉक प्रिंटेड आहेत, म्हणत लांबलचक स्पष्टीकरण दिले आहे. यावर अन्य युजर्सने हे कपडे आपल्यासारख्या सर्व सामान्यांसाठी नसतात अश्या आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अन्य एकाने प्रियाचे स्पष्टीकरण पाहून साडी विकायची पण पूर्ण प्रॅक्टिस झालेली आहे, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ह्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर अनेकांनी ही साईट आपल्यासाठी नाहीच असे गृहीत धरले आहे. त्यामुळे प्रियाचा व्यवसाय सुरू होतानाच नकारात्मकतेची री ओढताना दिसतोय.

Leave a Comment