अभिनेत्री तेजस्विनी पंडित करणार निर्मिती क्षेत्रात प्रवेश; वाढदिवसानिमित्त केला शुभारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपट, मालिका, वेबसिरीज, नाटक अश्या विविध मनोरंजनाच्या माध्यमांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचा काळ ३५ वा वाढदिवस झाला. या दरम्यान तिला तिच्या चाहत्यांनी आणि सह कलाकारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. पण तेजस्विनीने मात्र आपल्या चाहत्यांना एक थक्क करणारे सर्प्राइजच दिले आहे. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम उद्योजिका, उत्तम गायिका आणि आता..? आता या जबाबदाऱ्या कमी का काय म्हणून आणखी एका जबाबदारीस पेलण्यासाठी ती सज्ज झाली आहे. ‘क्रिएटिव्ह वाईब’ या नव्या प्रॉडक्शनच्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात प्रवेश करतेय. या नवीन उपक्रमाचा शुभारंभ तिने तिच्या वाढदिवसानिमित्त करीत चाहत्यांना सोशल मीडियावर हि बातमी दिली आहे.

https://www.instagram.com/p/CPNEDG6FezN/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत लिहिले कि, वाढदिवशी तुमच्या आवडीची गोष्ट करायची असते असं मोठे लोक म्हणतात! कलाकारांसाठी कलेच्या निर्मिती इतकी आवडती गोष्ट दुसरी कोणती असणार ? आणि म्हणूनच इतक्या दिवशीच्या स्वप्नाकडे आज पहिलं पाऊल टाकतोय!

https://www.instagram.com/p/CPKuekYFtda/?utm_source=ig_web_copy_link

Creative Viibe निर्मिती क्षेत्रातलं आमचं पहिलं पाऊल ! आमचं म्हणजे मी आणि माझा मित्र संतोष खेर चं ! विश्वास ठेवा आत्ता खुप मिश्रित भावना आहेत पण सर्वात वर फक्त आनंदाची आणि समाधानाची भावना आहे…आणि आमच्या कालाकृतींमधून ते आम्ही तुमच्या पर्यंत पोचवण्याचा मनापासून प्रयत्न करू. गणपती बाप्पा मोरया

https://www.instagram.com/p/CPNeOXTp6Gv/?utm_source=ig_web_copy_link

तेजस्विनीचा मित्र संतोष खेर यांच्यासह तिने ‘क्रिएटिव्ह वाईब’ पार्टनरशिपमध्ये सुरु केले आहे. मराठीसोबतच हिंदी मार्केटमध्येही हे प्रोडक्शन लवकरच उतरणार आहे. संतोष खेर हे दुबईतील व्यावसायिक असून त्यांना कलेची प्रचंड आवड आहे. कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन आणि त्यांच्या योग्य असे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

https://www.instagram.com/p/CL9NuR3FYWp/?utm_source=ig_web_copy_link

‘क्रिएटिव्ह वाईब’च्या अंतर्गत चित्रपट, वेब सिरीज, विविध शो अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांची निर्मिती करणार आहेत. त्याआधी ‘क्रिएटिव्ह वाईब’चा पहिला प्रोजेक्ट एक मराठी वेब शो असून तो ‘प्लॅनेट मराठी’ यांच्यासह केला जाणार आहे. या शोबाबतच्या अनेक गोष्टी अद्याप उघडकीस आलेल्या नाहीत.

Leave a Comment