दुसऱ्या मुलीसोबत संबंध असतानाही शिझानने तुनिषासोबत…; तुनिषाच्या आईचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने 24 डिसेंबर 2022 रोजी पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिषाचा सहकलाकार अभिनेता शिझान खान याच्यावर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान आज तुनिषाच्या आईने पत्रकार परीषद घेत शिझानसह त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. ‘शीझान नशा करायचा, तुनिषाने स्वत: मला याबद्दल सांगितलं होतं. त्याचे दुसऱ्या मूलीसोबत संबंध होते तरी देखील शीझानने फक्त तुनिषाचा वापर केला आणि तिला फसवलं, असे तुनिषाच्या आईने म्हंटले.

तुनिषाच्या आईने आज पत्रकार परिषद घेत तुनिषाच्या मृत्यूवरून शीझान, त्याची आई व बहिणीवर गंभीर आरोप केले. यावेळी तुनिषाची आई म्हणाली की, शीझान नशा करायचा, तुनिषाने स्वत: मला याबद्दल सांगितलं होतं. शीझानने फक्त तुनिषाचा वापर केला आणि तिला फसवलं. जेव्हा मी याबद्दल त्याला जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा मी त्याचं काहीच करु शकत नाही, जे करायचं ते करा,” असे शीझानने म्हंटले.

जर शीझानचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध होते तर तो तुनिषासोबत का रिलेशनमध्ये आला?, वयातील अंतर आणि धर्मामुळे दोघांचे ब्रेकअप झाले, असे शीझान म्हणत असेल तर मग सुरुवातीलाच प्रेम करताना वयातले अंतर- धर्म त्याला का कळला नाही? शिझानची आई सुद्धा तुनिषाला त्रास देत होत्या. पूर्ण कुटुंबानं तिचा फक्त वापर केला. शिझानने तिच्याकडून महागडे गिफ्ट घेतले, शीझानच्या बोलण्यामुळे ती खचली होती.

शीझानची आई तिला वारंवार फोन करुन तिला मानसिक त्रास देखील द्यायची. आत्महत्येपुर्वी तुनिषाने आईला फोन केला होता, तिला ख्रिसमस साजरा करण्यासाठी चंदिगढला जायचे होते. दोन दिवसांसाठी ती चंदिगढला जाणार होती. ती खुप खूश होती. मात्र, अर्धा तासात असे काय घडलं की तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाउल उचलले? असा सवालही तुनिषाच्या आईने पत्रकार परिषदेत केला.