अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही काहींना कोरोनाची लागण होत आहे. दरम्यान सिनेअभिनेत्री तथा शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करीत माहिती दिली.

राज्यात दिवाळी सणाच्या तोंडावर कोरोनाचे प्रकरण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे सणासुदीचा काळात लोकांची चिंता वाढली आहे. दरम्यान उर्मिला मातोंडकर यांना कोविड-19 ची सौम्य लक्षणे जाणवली, तेव्हा त्यांनी स्वताची कोविड चाचणी केली. त्यामध्ये त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. या कोरोना पॉझिटिव्हच्या आलेल्या रिपोर्टनंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. तसेच संपर्कात आलेल्या लोकांना आवाहन केले आहे की दिवाळी सणासुदीत लोकांनी विशेष काळजी घ्या.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्याकडून पक्षाच्या नेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली जात आहे. दरम्यान अनेकवेळा लोकांच्यमध्ये कार्यक्रमाच्या निमिताने जावे लागत आहे. दरम्यान आज कोरोना पॉझिटिव्ह असा रिपोर्ट आल्याने उर्मिला मातोंडकर यांनी याबाबतची माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

 

You might also like