आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचा समाज गौरव पुरस्कार शेखर काळे यांना प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातून प्रकाशित होणाऱ्या तिरंगा रक्षक वर्तमानपत्राच्या आणि आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा समाज गौरव पुरस्कार नुकताच मालदन (ता. पाटण) येथील युवा साहित्य समाज सार्वजनिक वाचनालय तर सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार मालदन येथील शेखर काळे यांना प्रदान करण्यात आला. मालदन येथील युवा साहित्य समाज वाचनालयाच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.

प्रत्येक वर्षी हा पुरस्कार विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि त्याच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या निमित्ताने केला जातो. तिरंगा रक्षकचे संपादक आणि आदर्श माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते मालदनचे माजी सरपंच अनिल सपकाळ, केसे ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदराव बडेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यावेळी युवा साहित्य समाज मंडळाचे अध्यक्ष सुहासराव काळे, युवा साहित्य समाज वाचनालयाचे संजय शिवाजीराव काळे, मालदनचे माजी सरपंच अनिल सपकाळ, उद्धवराव काळे, दिपकराव इंगवले, सूर्यकांत काळे, राहुल साळुंखे, हेमंत काळे, सचिन काळे, निलेश काळे, अमित देशमुख, संजय काळे, बाळासो काळे, पाडळी (केसे) गावचे ग्रामपंचायत सदस्य आनंदराव बडेकर, आदर्शमाता प्रतिष्ठानचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष जावेद मुजावर, युवा नेते अरुण जाधव यांच्यासह मालदन गावातील विविध संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment