Wednesday, February 1, 2023

अमित कुमार यांच्या वक्तव्याबाबत आदित्य नारायणने व्यक्त केली नाराजी

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२; हा एक सिंगिंग रिऍलिटी शो आहे. हा शो सोनी एंटरटेनमेंट वर प्रसारित होतो. इतकेच नव्हे तर हा शो सर्वाधिक लोकप्रिय शोंपैकी एक आहे. मात्र सध्या हा शो एका विशेष कारणामुळे जास्तच चर्चेत आहे. यामुळे शोचा टीआरपीदेखील घसरला आहे. गेल्या वीकेंडच्या किशोर कुमार स्पेशल एपिसोडमुळे शो व शोच्या परीक्षकांवर लोक सडकून टीका करीत आहेत. या एपिसोडसाठी आलेल्या किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनीही शो बाबत काही अशी वक्तव्ये केली कि प्रेक्षकांचा पारा आणखीच चढला आहे. याच वक्तव्यांबाबत शोचा होस्ट आदित्य नारायण याने नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

किशोर कुमार स्पेशल या एपिसोडमध्ये गेस्ट बनून आलेले किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनीही ‘इंडियन आयडल १२’ ची पोलखोल केली होती. शूट सुरु होण्यापूर्वीच मला स्पर्धकांचे कौतुक करायचे आहे, असे सांगण्यात आले आणि मी तेच केले असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे सर्वत्र शोबाबत अलग चर्चा रंगल्या आहेत. या संदर्भात ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य नारायण याने अमित कुमार यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. यात तो म्हणाला कि, माझ्या मनात अमित कुमार यांच्याबद्दल अपार आदर आहे. पण एक गोष्ट मी नक्की म्हणेन की, दोन तासात एका लेजेंड सिंगरला ट्रिब्युट देणे वाटते तितके सोपे नाही. आम्ही नेहमीच बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. कोरोना महामारीमुळे मुंबईत शूटींग बंद आहे, आम्ही दमणला शूट करत आहोत.

 

मर्यादित रिसोर्स आणि अगदी कमी क्रूसोबत आम्ही काम करत आहोत. आमचे रिहर्सल्सही लिमिटेड झाले आहेत. सेट नवा आहे. अन्य दुस-या चॅनलवर अनेक शो जुने एपिसोड दाखवत असताना आम्ही मात्र दर आठवड्याला नवीन एपिसोड देत आहोत. आमच्यावतीने आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे आदित्य म्हणाला. पुढे, अमितजी याआधीही अनेकदा आमच्या शोमध्ये आले आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी खूप एन्जॉय केले. या एपिसोडमध्येही त्यांनी किशोर दांच्या अनेक आठवणी, त्यांचे अनेक किस्से शेअर केलेत. स्पर्धकांचे कौतुक केले. शूट सुरु असताना काही गोष्टींबद्दल त्यांची नाराजी होती तर त्यांनी तेव्हाच ती सांगायला हवी होती, कदाचित त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही ऐनवेळी काही बदलही केले असते, असेही आदित्य म्हणाला.

ई-टाईम्सशी बोलताना अमित कुमार यांनी ‘इंडियन आयडल १२’च्या किशोर कुमार स्पेशल एपिसोडबाबत बोलताना म्हटले होते कि, ‘हा एपिसोड पाहून लोक संतापले आहेत, हे मला माहित आहे. किशोर कुमारसारखे कुणीच गाऊ शकत नाही, हे सत्य आहे. आजच्या तरूणांना किशोर कुमार यांच्याबद्दल काहीही माहित नाही. त्यांना फक्त रूप तेरा मस्ताना हे गाणे माहित आहे. मी ‘इंडियन आयडल १२’च्या एपिसोडमध्ये गेलो आणि मला जे काही करायला सांगितले होते, तेच मी केले. सर्वांची भरभरून प्रशंसा करण्यास मला सांगितले होते. स्पर्धकांनी कसाही परफॉर्मन्स दिला तरी त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांची प्रशंसा करा, असे मला सांगितले गेले होते. मी तर अ‍ॅडव्हान्समध्ये स्क्रिप्टही मागितली होती. पण त्यांनी ती दिली नाही,’ असे ते म्हणाले.