उद्योगमंत्री कोण आहेत?? उपस्थितांकडून गद्दार- गद्दार नारेबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज थेट रत्नागिरीत जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला. वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यांनतर आधीच राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर असून आपल्या जाहीर भाषणात त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला. यावेळी उद्योगमंत्री कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला असता शिवसैनिकांनी गद्दार, असे उत्तर दिले. आदित्य यांनी 3 वेळा हा प्रश्न विचारला यावर शिवसैनिकांनी गद्दार गद्दार गद्दार अशी नारेबाजी करत सामंतांवर हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी मविआ सरकारकडून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी तळेगाव येथील जागाही बघितली होती. राज्यात दीड लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाख रोजगार येणार होते. गद्दारांनी सरकार पाडल्यानंतरही एमआयडीसीने प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, या सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीत असं आदित्य ठाकरे म्हणाले. आत्ताच्या उद्योगमंत्र्यांना या प्रकल्पाबाबत काही माहितीही नव्हती. वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर उद्योग मंत्र्यांना याबाबत विचारल्यावर माहिती घेऊन सांगतो असे त्यांनी म्हटले असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली.

या लोकांनी फक्त शिवसेनेशीच नव्हे तर महाराष्ट्राशीही गद्दारी केली अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला .डबल इंजिन सरकार असताना प्रकल्प राज्याबाहेर गेला. स्वतःला ५० खोके आणि महाराष्ट्राला मात्र धोके हेच या सरकारचे सत्य आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला.