कौतुकास्पद ! इस्लामपुरातील तरुणाने बनवली शेतीसाठीपूरक चारचाकी गाडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव कौशल्य वापरून शेतीपूरक चारचाकी गाडी तयार केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर करत तयार केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदा आहेत मशागतीची कामे या चारचाकी गाडीने सहज करता येत आहेत. एक वर्षाच्या मेहनतीने आलेल्या गाडीची अंतिम चाचणी आज यशस्वी झाली. तेव्हा कुमार पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. इस्लामपूर-पेठ रस्त्यावर विष्णुनगर येथे कुमार पाटील यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.

गेली वीस वर्षे च्या माध्यमातून शेतक-यांना छोटी-छोटी सायकल कोपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देत आहेत, हे असतानाच शेतकऱ्यांना उपयुक्त असे नवीन काही करता येईल का? याचा विचार त्यांनी केला. एक वर्षांपूर्वी त्यांना चारचाकी गाडीची कल्पना सुचली. चारचाकी गाडीसाठी लोखंडी साहित्य वापरताना दुचाकीचे इंजिन वापरण्याचे ठरले १०० सी सी इंजिन घेत त्यापासून चारचाकीची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. चारचाकी गाडी तयार करीत असताना स्टेरिंग ऐवजी हॅण्डलचा वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चारचाकी कारप्रमाणे गिअर टाकून गाडी पाठीमागे सहज कशी घेता येईल का? यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यशही आले आहे.

इंजिन दुचाकीचे असले तरी रिव्हर्स गियरचा बॉक्स स्वतःच्या कल्पकतेने तयार केला आहे. त्यानंतर तयार गाडीला शेतीपुरक अवजारे कशी जोडता येतील ? यासाठी मित्रांशी चर्चा करून तशी अवजारे ही बनवण्यात आली. सर्वसामान्य शेतकरी वर्गाला कोळपणी, नांगरट, पेरणी तसेच औषध फवारणी या शेती कामासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. खडतर रस्त्यावर कमीत कमी जागेत सहजपणे गाडी नेता येते. त्यामुळे अरूंद जागेत गाडीचा वापर शेतीला कसा करता येईल? असा विचार केला गेलाय. शहरातून शेतातील गोठयामध्ये पशुखाद्याची पोती वाहतूक तसेच वैरणीची ने-आण करणे यासाठी सीटच्या मागे दोन्ही चाकांच्या गार्डवर तशी रचना केली आहे. अल्प वेळेत व कमी खर्चात चारचाकी गाडी काम करत असल्याने शेतकऱ्यांना ती नक्कीच वरदान ठरणार आहे.

Leave a Comment