शरद पवार- वळसे पाटील हे फेल्युअर; गुणरत्ने सदावर्ते यांच्याकडून बड्या नेत्यांचा एकेरी उल्लेख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली. त्यानंतर आज आझाद मैदानावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर जाऊन ठाकरे सरकावर व मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करीत हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तुम्ही फार हुशार आहात. कालच्या कष्टकरांना तोडण्याचा जो तुम्ही प्रयत्न केला त्यात तुम्ही नापास झाला आहात, अशी टीका सदावर्ते यांनी केली.

मुंबईत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानावर जाऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्या ४० बांधवांनी या लढ्यासाठी कुर्बानी दिली. शहीद झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील, शरद पवार, विश्वास नांगरे पाटील हे आहे स्टेटचं फेल्युअर आहे. आणि याला म्हणतात या ४० आत्महत्या नव्हत्या त्या इन्स्टिट्युशनल हत्या आहेत. महाराष्ट्रटातील कष्टकरी जो एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी लढा उभा केला आहे तो मानवाधिकाराचा आहे. शरद पवार यांनी दोन दिवसांपासून ज्या प्रकारे कष्टकऱ्यांना तोडण्यासाठीचा, देवाणघेवाणीचा प्रयत्न करून देखील हा कष्टकरी तुटलेला नाही. तर तो निखर मानेने उभा आहे.

काही वेळावपूर्वी पोलिसांच्या गराड्यात एक पत्रकार परिषद झाली. आमचे दोन आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची पत्रकार परिषद झाली. त्या माध्यमातून पडळकर, खोतांची स्वत:पूर्ती ती स्थगिती दिली आहे. पडळकर आणि खोत यांना एसटी महामंडळाचा कष्टकरी कर्मचारी या आंदोलनातून आझाद करत आहेत. ही लोक चळवळ आहे, असे सदावर्ते यावेळी म्हणाले.

संजय राऊत हे फक्त शिवसेनेसाठी रोखठोक – अ‍ॅड. सदावर्ते

दरम्यान, आझाद मैदानावरून अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरहि निशाणा साधला. “संजय राऊत यांनी एकदाही त्यांच्या ‘रोखठोक’ मधून कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली नाही, हे लज्जास्पद आहे. तसेच राऊत हे माझे मित्र आहेत आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घडलेले विद्यार्थी कायम तठस्थतेची भूमिका घेतात. मात्र, संजय राऊत यांची सध्याची भूमिका लज्जास्पद असल्याची टीका अ‍ॅड. सदावर्ते यांनी केली.

Leave a Comment