अ‍ॅन्ड्रॉइड यूजर्ससाठी Google Photos ने लाँच केले व्हिडीओ एडिटिंगचे नवीन अ‍ॅडव्हान्स फीचर्स

नवी दिल्ली । गेल्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये गुगल (Google) ने फाेटाे एडिटिंग (Photo Editing) फीचर्स गूगल फाेटाेज (Google Photos) मध्ये दिले होते. कॅलिफोर्नियामधील माऊंटन व्ह्यू येथे असलेल्या गुगलने कंपनीने आता अँड्रॉइड युझर्ससाठी व्हिडीओ एडिटिंग फीचर दिले आहे, ज्यानंतर या अ‍ॅपच्या माध्यमातून आता आपल्याला व्हिडीओमध्ये अधिक एडिटिंग करता येईल. आतापर्यंत, Google प्लॅटफॉर्ममधील हे फीचर्स फक्त आयओएस युझर्ससाठीच होते. हे नवीन व्हिडिओ एडिटिंग फीचर्स वापरण्यासाठी आपल्याला Google फाेटाेज अ‍ॅप अपडेट करावे लागेल.

30 पेक्षा जास्त कंट्राेल
या नवीन अपडेटसह, आपण आपल्या फोनवर या अ‍ॅपद्वारे व्हिडिओ एडिटिंगसाठी 30 पेक्षा अधिक कंट्राेल वापरण्यात सक्षम व्हाल, यामध्ये आपल्याला व्हिडिओ क्रॉप देखील करता येईल, तसेच फिल्टरसह, व्हिडिओला स्टॅबिलाइज्ड देखील करता येईल. इतकेच नाही तर व्हिडिओचा ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट सॅच्युरेशन तसेच वॉर्म देखील एडजस्ट करता येईल. जे आतापर्यंत फक्त फाेटाेमध्येच करता यायचे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे अ‍ॅप वापरल्यानंतर ती लोकंही व्हिडिओ एडिटिंग अगदी सहजपणे करू शकतील, ज्यांना हे कसे करावे हे माहित नाही किंवा ज्यांच्याकडे व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर नाही.

पिक्सल स्मार्टफाेनचे फीचर्स
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे Google टॅब्लेटवर वापरली जाणारी प्रीमियम फाेटाे एडिटिंग फीचर्स जे कि अजूनपर्यंत फक्त पिक्सल स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत ते हि मिळतील. ज्यामध्ये पोर्टेबल ब्लू, पोर्टेबल लाइट, कलर पॉप समाविष्ट आहे. Google One subscribers करणाऱ्यांसाठी दुसऱ्या Android डिव्हाइसवर उपलब्ध असतील.

Google One युझर्ससाठी हे नवीन फीचर्स
गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की,” येत्या काही दिवसांत गुगल वनचे ग्राहक सुपर फिल्टर वापरण्यास सक्षम होतील, त्यानंतर त्यांचे फाेटाे फक्त एका क्लिकवर एडिट केले जाईल. यासह सनराइज, सनसेटची फोटोग्राफी करणारे वेगवेगळ्या मोडद्वारे त्यांच्या गोल्डन अवर फोटोचा कलर आणि कॉन्ट्रास्ट बदलण्यात सक्षम होईल. हे फीचर्स लवकरच येत आहे. हे फीचर वापरण्यासाठी किमान 3 जीबी रॅम आणि अँड्रॉईड किंवा त्यावरील अपडेट असणे आवश्यक असल्याचे गुगलचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like