विशेष सरकारी वकीलांचा साताऱ्याच्या मैदानात मॉर्निंग वॉक; सोबत बंदूकधारी सुरक्षारक्षक…

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

वाई हत्याकांडातील आरोपी डॉ. संतोष पोळ याच्या प्रकरणा संदर्भात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे साताऱ्यात आले आहेत. दरम्यान त्यांनी आज सकाळी साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडिअम येथील मैदानात मॉर्निंग वॉक केला. यावेळी त्यांच्यासोबत बंदूकधारी सुरक्षारक्षक देखीलपहायला मिळाले.

वाई धोम हत्याकांड प्रकरणाची सातारा जिल्हा न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी ते रविवारी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी आज सकाळी त्यांनी छत्रपती शाहू स्टेडिअम येथील मैदानात जाऊन मॉर्निग वॉक केला.

Private Ad 3rd Paragrah

सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. संतोष पोळ यांना अटक केली आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत.