व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

श्रद्धाची हत्या का केली? आफताबने कोर्टात सांगितलं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आज साकेत कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आफताब याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. यावेळी आपण रागाच्या भरात श्रद्धाचा खून केला असा जबाब त्याने दिला. त्यानंतर न्यायालयाने आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

आपण रागाच्या भरात कोणताही विचार न करता हत्या केल्याचा दावा आफताबने न्यायाधीशांसमोर केला. घटना क्षणार्धातच घडली असं तो म्हणाला. हत्येला आता ६ महिने झालं असून मला घडलेली घटना नीट आठवत नसल्याचंही आफताबने कोर्टाला सांगितलं. तसंच आपण पोलिसांनी तपासात सहकार्य करत असून, यापुढेही करत राहू असे आश्वासन त्याने दिले.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबने तीन करवतीच्या ब्लेडचा वापर केला होता. श्रद्धाचे तुकडे केलेल्या शरीराचे भाग कुठे फेकले आहेत, याची माहिती पोलिसांना दिली असल्याची माहिती आफताबने कोर्टासमोर दिली. तसेच त्यासाठीचा नकाशाही पोलिसांना तयार करुन दाखवल्याचं त्याने म्हटलं.