१४ एप्रिलनंतर ग्रामीण भागातील लॉकडाउन सरकारने उठवावा- राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. याचबरोबर कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहन वगळता राज्यात जिल्ह्यांतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या १४ एप्रिलला घोषित केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन संपणार आहे. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन आणखी २ आठवडे जिल्हाबंदी कायम ठेवण्याचा विचार करत आहे. दरम्यान माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी १४ एप्रिलनंतर लॉकडाउनमधून ग्रामीण भागाला वगळावे अशी मागणी शासनाला केली आहे.

लॉकडाउनचा विपरीत परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर होतो आहे. त्यामुळं १४ एप्रिलला देशातील लॉकडाउन संपल्यानंतर महानगरं आणि काही करोना बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागाला त्यातून वगळण्यात यावं अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. द्राक्षं, आंबे, पपई, भाजीपाला आणि दूध हा शेतीमाल बाजारपेठांपर्यंत न पोहचवता आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली साखळी अबाधित असल्याचा दावा सरकारने केला असला तरीही ते म्हणणे आणि वास्तव हे वेगळे आहे असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

Leave a Comment